आदिवासी दिवस व आदिवासी अधिकारांचा घटनाक्रम, विश्व आदिवासी दिवसाच्या पुर्वसंध्येस सर्व आदिवासी बांधवांना बारा कलमी संबोधन....
विश्व आदिवासी दिवसाच्या पुर्वसंध्येस सर्व आदिवासी बांधवांना बारा कलमी संबोधन आदिवासी दिवस व आदिवासी अधिकारांचा घटनाक्रम सर्वांना जोहार, प्रथमतः सर्वांना जागतिक आदिवासी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रिय बंधुभगीनींनो, युरोप व युरेशियातून वसाहतवादाला सुरुवात झाली. यामध्ये संपूर्ण जगातील आदिवासी समुदायाच्या संदर्भात पुढील घटनाक्रम मांडता येईल. 1) इसवीसन 1300 पर्यंत जगातील आदिवासी मोठ्या प्रमाणावर स्वशासन व्यवस्था, संस्कृति आणि स्वातंत्र्याचे जीवन जगत होता. 2) इसवीसन पूर्व 5000 वर्षांपुर्वी आर्य आक्रमण भारतात झाले. आदिवासी जंगलात लोटले जाऊन तेथे आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून राहिले. इसवीसनाच्या 7 व्या शतकानंतर इस्लामी आक्रमण आफ्रिकेत सुरू झाले. इसवीसन 1492 मध्ये युरोपियन आक्रमक कोलंबसने अमेरिकेत पाऊल ठेवले व पुढील काही दशकात अमेरिकेतील 2 करोड पेक्षा जास्त आदिवासींची बंदुकीच्या जोरावर कत्तल करून तेथील रेड इन्डियन आदिवासींना गुलाम बनवले. त्यांना मानव म्हणून नाकारले आणि मानवापेक्षा खालच्या दर्जाचे - जंगली म्हणून त्यांची गणना केली. भारतात सुद्धा राक्षस, वानर (वन-नर) इ. शब्द वापरले गेले. 3) या...

















Comments
Post a Comment