संयुक्त राष्ट्रसंघ घोषित आदिवासी (मुळनिवासी ) अधिकार जाहिरनामा
¶संयुक्त राष्ट्रसंघ घोषित आदिवासी (मुळनिवासी ) अधिकार जाहिरनामा ¶ आदिवासी आधिकार दिनाची घोषणा 13 सप्टेंबर 2007 रोजी युनो ( संयुक्तराष्ट्रसंघ)ने केली आहे . या अधिकारा विषयीची माहिती संबंध आदिवासी समुदयापर्यंत पोहचली पाहिजे ,अधिकारांची जाणीव आदिवासीना झाली पाहिजे आणि आदिवासींमध्ये जागृती झाली पाहिजे या हेतूने माहिती पोस्ट करीत आहे आज आम्ही जेअधिकार घोषणापत्र बघतो ते ILO (विस्व कानून संघटना) व मानव अधिकार संघटना यांनी तयार केले आहे . संयुक्त राष्ट्रसंघ घोषित आदिवासी (मूलनिवासी ) अधिकार घोषणा पत्र 13 सप्टेंबर, 2007 साली 158 देशानी मतदानाद्वारे स्विकारले आहे ,त्यात 143 देशानी ठरावाच्या बाजूने तर 4 देशानी (ऑस्ट्रेलिया ,कॉनडा, अमेरिका, न्यूज़ीलैंड )विरोधात मतदान केले होते आणि 11 देशानी मतदानात भागच घेतला नाही. ज्या चार देशानी घोषणा पत्रावर सही केली नव्हती त्यातील अमेरिका, कॉनडा, ऑस्ट्रेलिया या तीन देशानी या घोषणा पत्रावर दोन अटिवर सही केली आहे . या घोषणा पत्राच्या बाजूने भारत सरकारने सप्टेंबर 2007 ला मतदान केले असले तरी , अनुच्छेद 46 च्या अधीन हे मतदान केले आ...